Wednesday 29 May 2013


                             उलगुलान

लोकसंघर्ष मोर्चाचे मासिक ई-मुखपत्र
वर्ष पहिले                     अंक पहिला                    माहे मे 2013

संघर्ष परिवर्तन की लढाई का पहिला सुत्र है!”
                             - मार्क्स

विशेष आवृत्ती संपादक
मा.प्रतिभाताई शिंदे
राष्ट्रीय सचिव,लोकसंघर्ष मोर्चा


    संपादक     कार्यकारी संपादक       व्यवस्थापक              सहयोग            शाम पाटील    हर्षद काकडे      आनंद भालेराव/भुषण वानखेडे  स्वप्निल महाजन
lsmorcha@gmaill.com

 संपादकीय
 प्रिय साथी, झिंदाबाद...!!!
      ‘उलगुलानचा पहिला अंक हाती देतांना मनस्वी खुप आनंद होत आहे. गेल्या वीस वर्षापासुन खान्देशातील तसेच मध्यप्रदेश व गुजरातच्या सीमावर्ती भागात आदिवासी,दलित व ग्रामीण बहुजन समुहांचा लोकलढा म्हणुन संघर्षरत असणार्‍या लोकसंघर्ष मोर्चाचे काम आज आपली वीशी ओलाडुंन अधिक तरुण व तेजस्वी होत आहे. या वीस वर्षा मध्ये संघटना म्हणुन कार्यरत असतांना अनेक उतार व चढाव संघटनेने पाहीले आहे. पण या सार्‍यांना तोंड देत आपल्या कार्यामुळे व निष्ठावान कार्यकर्ता, खंबीर त्यागी नेतृत्वामुळे संघटना आज उभी आहे. येणार्‍या काळाची आव्हाने ओळखून संघटनेने घेतलेली भुमिका व त्यावर उचललेले कृतीशील पाउल या सार्‍यातून मिळालेला विजय व त्यातून कार्याची पुढची दिशा ठरवत संघटना आपला हा क्रांतीरथ पुढे नेत आहे. या क्रांतीरथाला सक्षमपणे पुढे नेण्यासाठी त्याला हजारो कष्टकरी,दर्‍याखोर्‍यात राहणार्‍या तसेच काळ्या आईची सेवा करणार्‍या खर्‍या भूमीपुत्रांचे बलदंड बाहु दिवस अन् रात्र खंबीरपणे झटत आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतरदेखील देशातील सर्व सामान्य जनतेला तिच्या मूलभुत अधिकरापासुन वंचित रहावे लागत असुन. भारतीय संविधानाने सांगितलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, धर्मनिरपेक्षता, न्याय या मानवतावादी मुल्यांना तिलाजंली देत स्वार्थी व संधीसाधु राजकारणामुळे देशातील 82% जनता अजुनही दारिद्र्यरेषेखाली आहे. देशाभरात होणार्‍या धार्मिक दंगली व वाढत्या जातीय अत्याचाराच्या घटना,शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या, दहशतवादी कारवाया,महीला अत्याचाराच्या वाढत्या घटना देशासमोर नवीन आव्हाने म्हणुन उभी राहत आहेत. त्यासोबतच वाढती बेरोजगारी व तरुणाई मधील वाढता असंतोष ही सारी आवाहने देशासमोर आवासुन उभी आहेत. ही सारी नवी आवाहने झेलत व त्यावर उत्तरे शोधत संघटनेची वाटचाल सुरु आहे.
 या सार्‍यांमधे संघटनेच्या वैचारिक भुमिकेची स्पष्टता व्हावी व क्रांतीची ही वैचारिकता सर्वापर्यंत पोहचावी या करीता हा मासिक प्रपंच सुरु करीत आहोत.
 कामाचा व्याप असुनसुध्दा वेळेत वेळ काढुन संघटनेच्या राष्ट्रीय सचिव प्रतिभाताई शिंदे यांनी खुप छान व तितकाच वाचनिय असा लेख पाठवून या अंकाची गुणात्मकता वाढवली. निश्चितच आपण सर्वांना हा पहिला वहिला बाळबोध अंक आवडेल हि अपेक्षा करतो. व आपणा सर्वांच्या सुचनांचे उलगुलानची संपादकीय टीम स्वागत करते.

                                             आपला
                                 शाम पाटील व सर्व संपादकीय सहकारी
                                            उलगुलान

No comments:

Post a Comment